पर्यावरण .....एक ध्यास

"तू जंगलं तोडलीस एकापाठोपाठ मूर्खासारखी. .
आणि आता स्वच्छ हवा शोधतोयस शहाण्यासारखी!

प्लास्टिकचा अविचाराने चालू आहे वापर, 
अरे आत्ता तरी त्याचा पुनर्वापर कर!

तुंबली गटारे ,भरले नाले,स्वतःच्याच बुडण्याची तयारी 
केलीस,
इतकं स्वार्थी वागून पृथ्वीची काय रे अवस्था केलीस?

प्रदूषित झालंय पाणी,तहानही मरून गेलीये,
मोकळा
श्वास घ्यायचं म्हंटलं, तर माझाच जीव गुदमरतोय,
तुझा वेळ माञ आधुनिकता मढवण्यात जातोय!

बोडक्या जमिनीवर झाडं लावून जपशील?
तरच कुठेतरी काळी आई वाळवंट होण्यापासून वाचवशील.

पावसाचा समतोलही कसा बिघडला, 
आता कळलं तुझा अतिव्यवहारीपणा कसा नडला!

थांबवशील का रे प्रदूषण बेहिशोब आत्ता,
नाही तर निसर्ग राहील जागच्या जागी,
तुझा जीव माञ राहील थोडक्यात जाता जाता!

निसर्ग देत राहतो भरमसाठ, 
तू हावरटासारखा वापरून फिरवतोस पाठ!

तुला काय वाटलं? पर्यावरण बिघडतय!
अरे नाही त्याला तुझी जराही गरज नाही !

खरं तर तुझाच जीव आहे धोक्यात, 
तरीही वागतोयस निर्लज्जासारखा तोरयात!

पण अजूनही संधी आहे,सुधर जरा,
जपशील आईसारखं पर्यावरणाला ,
तरच ते मुलासारखं जपेल,घडवेल तुला!"





-कुणाल विजय ठाकरे. 



















































Comments

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤