मुरांबा. .........❤❤
मुरांबा. ..........मुरलेल्या आठवणींचा. .😋😍🍲🍊🍊💚
चेहरा हास्यानं फुलून जावा ....आणि पटकन सगळ्या
जुन्या आठवणींचा खजिना खुलावा.......
कधी आपण किती सहज चुकलेलो ,आणि सगळे दिसतात तुमच्यावर हसतांना. ....
आणि आपण एकटेच रडलेलो .....वेड्यासारखं. ..
आठवावी कधीतरी भावंडांसोबत केलेली गम्मत.............
छोट्या छोट्या स्पर्धा. .चुरस आणि आव्हानं.....
पावसाळ्यातले चिखलात रूतलेले पाय समोर दिसावे .....कधी जोरदार हवेत उडून गेलेली छत्री आठवावी. .......
आणि हसू फुटावं कारंज्यासारखं ...... .निरागस. ........मनमुराद
कधी तरी पाहावं आठवून आजीच्या बटव्यातली खाऊ चोरणं.....
आजोबांचा चष्मा लपवणं ... .....त्यानंतर आईने दिलेला बेदम मार......!
अचानक समोर दिसावं आपल्यातलच अल्लड मन नव्याने. ...............
शाळेतल जड दप्तर आठवावं......त्यातल्या गोड आठवणी पुन्हा उलगडाव्या ........रफ वहीतल्या
वाकड्या रेशांसारख्या.............मनस्वी.....
कधी झाडाखालचं वनभोजन आठवावं वर्गमित्रांसोबतच .........
आठवावी पेपरमिंटच्या गोळ्यांची जिभेवर रेंगाळणारी चव......
आठवड्याच्या बाजारातली खाऊ हवीहवीशी वाटलेली........
गणिताच्या आकड्यांचा लपंडाव ........
आठवावी हिवाळ्यातली ,आईने शिवलेल्या गोधडीची खास ऊब..............
ते पाण्यात होड्या सोडणं...........
आठवाव्या लिमलेच्या गोळ्या .....रंगीबेरंगी. ........
कधी चिंच ,बोर,आंबे,चिक्कू खाण्यात रमलेलं भाबडं मन आठवावं. .....
कधी जत्रेतली धमाल आठवावी. .......समाधान देणारी.......
जाणवत रहावं .....घरच्यांचं वाढतं प्रेम आणि शिस्तही........
हसावं नव्याने आठवून छोट्या छोट्या गोष्टीतला निराळा आनंद ........
जगावा प्रत्येक क्षणी एकत्र असल्याचा आनंद. .....
आठवावं रडणं, हसणं. ...खंबीर होणं जसंच्या तसं .....काल घडल्यासारखं.......
डोळ्यांत आसवं सजावी आणि हास्याचा जल्लोष व्हावा..........अनोखा...
आणि अवीट गोड वाटत रहावा हा जिव्हाळ्याने सजलेला ...... .......
आठवणींच्या पाकात मुरलेला अनोखा मुरांबा. ..............
जो कधीही आठवा .....न खाताच त्याचा गोडवा आनंद पसरवेल.......
ज्याच्या वासाने कोपरा मनाचा होईल हळवा .......अलगद.........सहज.....
-कुणाल विजय ठाकरे

Comments
Post a Comment