मनीमाऊ 😍😍😺😼

इवलेसे डोळे, वरती दोन टवकारलेले कान ,
इकडून तिकडे पळते हलवत शेपटी छान! 

एरव्ही तीचं मन दुधाच्या पातेल्याभोवतीच फिरत असतं,
उंदरांशी इकडे तिचं चांगलच वैर असतं. 

नाकाखालच्या पांढरट मिश्या कशा दिमाखात मिरवते,
किती नखरे असतात तिचे सर्वांकडून आपले लाड पुरवते!

धावत असते उंदरांच्या मागे पडत नाही कधीही तरी!
आवडते आम्हाला मनीमाऊ चोरून दूध पिते जरी! 

कधी डोळे मिटून ती मस्त दूध पित असते,
आपल्याला कुणी पाहिल याची तिला चिंता नसते!

उंदरांची तिची मेजवानी रोजच सुरू असते, 
वीजेच्या प्रकाशातले किटक खाण्यात ती हल्ली रमते!

प्रेमाने काही  खायला दिले की नंतर,
पायाजवळ डोकं ठेवून झोपते,
तर कधी निवांत बसल्यावर तिथेच ,
हक्काची उशी मिळाल्यासारखी टेकून बसते!

जरा डोक्यावरुन हात फिरवला की कशी टकमक पाहत राहते,
घरातला कोपरानकोपरा ती एखादी शोधमोहीम घेतल्यासारखा पूर्ण करत असते!

क्षणाक्षणाला किती गोड वाटत असते,
कुणी,मनी,मन्या, मनुल्या,काय काय नावाने तिला बोलावत असतं! 
घरातल्या सदस्यांइतकच तिलाही स्थान असतं!

कधी कधी वाटतो कोणाला ञास,
पण जरा जाऊदे कुठेतरी ,मग मनीची आठवण येते खास!😊

आपल्या लहान  पिलांना, आपल्या तोंडाने किती सहज अलगद उचलते,
तेव्हा मनीमाऊमधली  काळजी करणारी आई दिसते!

आपल्या पिल्लांना किती छान जपत असते ,
कितीही मोठी झाली तरीही छोटीच दिसते😊!

घरात जेव्हा नसतं कोणी, 
तेव्हा म्यॅव ..म्यॅव  करून घर डोक्यावर घेते,
पटकन दरवाजा उघडला कि कशी पायाखाली घुटमळत राहते!
स्वयंपाकघरात मम्मीच्या मागे मागे फिरते ,
सगळे सोबत आहेत हे बघून बिनधास्त असते!

किती किती रंगांची, गोल टपोरया डोळ्यांची ,निरागस अशी,
आपल्या शेपटीशी खेळत असते.

कधी टुणटुणीत, खोडकर,कधी खुन्नस दाखवणारी ,
कधी प्रत्येक वेळी वेगळा रूबाब असलेली दिसते!

जिच्यातल्या cutenessला  व्यक्त करायला शब्दच नाहीत !
अशी ती गोडुली, सोनुली,सानुली, मनीमाऊ असते!

जी प्रत्येकाच्या घरात अवखळ आनंद वाटत असते,
कधी आपली लाडकी मैञीण होते कळतच नाही!
अशी ही मनीमाऊ एखाद्या लाडक्या मिञापेक्षा कमी नसते!😍






                           -कुणाल विजय ठाकरे. 




















Comments

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤