चांदवा. ..🌕🌕💙
चांदवा..🌕🌕💙 अशुभ विचारांचे ढग मनातले दुर व्हावे ... रूप चांदोबाचे हळूच नजरेत दिसावे.... खिडकित ह्या सुखाच्या ...चांदणे पडावे... पाहून हा नजारा मन तृप्त व्हावे.... डोळ्यांत सामावून घ्यावी प्रत्येक छवी चंद्राची भाबड्या मनात आत्ता चांदणरात्र फुलावी... शीतल..शांत चांदोबाची सोबत मोहक वाटावी ... तेजाने त्याच्या आपलीच प्रतिमा उजळावी..... पाहत राहावं तासनतास त्याला ढगांशी लपंडाव खेळताना.... जाणवावी त्याची सावली मनावर पडताना.. चांदण्यांच्या लगबगीनं आसमंत भरून जावं.... हे गोड नवल निसर्गाचं भरभरून जगता यावं.... दूरचा चांदोबा जवळ दिसावा.... भास-आभासांचा खेळ हा गंमतीशीर वाटावा.. गार हवाही सोबतीनं कशी अल्लड वाटावी. ... काळ्याभोर ढगांमध्ये चांदोबाची स्वारी हळूच लपून जावी..... मग काय ,रिकामं आभाळही हवसं वाटावं.. तेज त्या चंद्राचं मात्र सर्वांगात भिनल्यासारखं वाटावं.. त्या आकाशाकडे कृतार्थ होऊन पाहत रहावं..हा अनोखा चांदवा आठवत...पुन्हा पुन्हा. .... ...