सावल्या मनातल्या••••••••••

  चांगल्या-वाईट  आठवणींना तू   पुन्हा आठवून बघ ना,
हळवा कोपरा मनाचा सापडेल तुला,जगणं नव्याने पुन्हा शिकवेल तुला.

खुप झाल तुझ बाहेर आनंद शोधण,
 डोकावून बघ तुझ्याच मनात एकदा ,
खुप शांतता जाणवेल तुला.,
तो एकटेपणा कर बाजूला आणि आनंदाला जागा दे ना जरा कायमची. .....

हसु तुझ किती मावळलय रे ,
पुन्हा शोध स्वतःला आरशातल्या काचेवर,
आणि त्यातून मनात खूप खोलवर..दिसेल तुला तुझच असणं पहिल्या सारखं..
जपशील का ते?कायमच....

अनुकरण कोणाचं का करतोयस तू?
खरेपणा तुझ्यातला  शोध ना जरा ..
अंतर्मुख हो असं किती सहज बोललास परवा कोणालातरी. ..........
आजमाञ मला अपराधी वाटतोयस तु तुझ्याच नजरेत....

हरवण खूप झालं  आत्ता एखाद्या गोष्टीत.........
आजमावून  बघ ना स्वतःला स्वतःसमोरच कधीतरी.

असणं किती छान असायचं तुझं ,
आत्ता माञ लवकर वैतागतोयस चिडखोरासारख ,
हताश असल्यासारखं. ......
तरीही जागा हो रे मनापासून मनातून. .
तु नक्की शोधू  शकशील...

निशब्द नसतं  रे कोणी सगळं अलबेल असतं मनात प्रत्येकाच्या. ..
स्वतःला शोधण्याचा प्रवास, प्रवास नसतोच रे ,
ही  खूप सहज सुरूवात  असते घडण्याची हो ना!

तू ही  मनाच्या खोल डोहात  जाऊन बघ ना,
तुला   काहीतरी नवीन सापडेल ,तुझ्याच मनातलं
तुला घडवणारं ......

बनून बघ न स्वतःच स्वतःची प्रेरणा,
होऊदे त्रास स्वतःला, उजळून निघूदे तुझं स्वत्व नव्याने. .........

संवाद साधत रहा मनाशी इतरांसारखा
नेहमी खरंखरं  चाचपडून बघ ना स्वतःला
निरागस सावल्या मनाच्या सापडतील तुला.....
   
         
                             -कुणाल विजय ठाकरे. 









 .




  

Comments

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤