चला कोरोनाला हरवूया••••
कोरोनाशी युद्ध आपले सुरू ..........
ऐनहोळीवर घातलंय ह्याने विरजण,
कोरोनानो केली हो पाचावर धारण!
हया संकटात आत्ता कोणी नाही वाली,
सर्वञ कोरोनाचीच चर्चा सुरू झाली!
आत्ता आणीबाणीची वेळ आली!
तोंडावर असतो हल्ली mask,
त्यात लाॅकडाऊनचा अनोखा task.
मनात माञ चोवीस तास मरणाची भीती,
लोकं दगावतात ह्याने सांगू शकत नाही किती?
सरकारचे प्रयत्न सुरू आहेत फार,
कोरोनाचा फैलाव करतोय माणसांवर छुपे वार!
लोकांच्या तोंडी आहेत शिव्या चीनला,
बर संकटात ढकलून, चीन कधी येईल का मदतीला?
जगभर एवढ्याशा व्हायरसने हाहाकार माजवलाय,
चीन माञ स्वतःला वाचवून ,मी नाय त्यातला म्हणत बसलाय!
भारत सरकारने वेळीच लागून केलाय लाॅकडाऊनचा ऊपाय,
बघूयात करून हयानं होत तरी काय?
ईकडे लाॅकडाऊनमधेही लोकांचा जीव काही रमेना,
त्यांचा पाय काही घरी थांबेना!
दुसरयाच दिवशी बाजारात लोकांची तोबा गर्दी,
नियमभंग करणारयांना सरळ करुन वैतागली वर्दी!
सरकारी यंञणा वेगाने करतीय हालचाल,
डाॅक्टर्स -नर्स अक्षरशः जातीने करताएत रूग्णांची देखभाल!
सरकारने 'कोरोना पॅकेज'ही जाहीर केलय,
कुठेतरी वाटतय आपणही तोडू शकतो हे कोरोनाच वलय.
सरकार ,पोलीस,नर्स,प्रसारमाध्यमे झटतात देश वाचवायला,
मग एक सुजाण नागरिक म्हणून आपण नको काही करायला?.
मुळात कोणाला हौस आहे व्हायरसने मरायची?
मग घाई असावी ,लाॅकडाऊनमधेही बाहेर पडायची?नाही का?
म्हणून मिञांनो आत्ता ऐका जरा,
एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करू,
ह्या कोरोनाचं अस्तित्व मिटविण्यासाठी :
सतर्कतेने ,निष्ठेने असेच राहूदे कोरोनाशी युद्ध आपले सुरू!
- कुणाल विजय ठाकरे

Comments
Post a Comment