सौंदर्य नजरेतलं..........
सौंदर्य म्हणजे,
इवल्याशा कळीच मोहक फुल होताना तो क्षण जगणं,
तर कधी कुणाच्या तरी चेहऱ्यावर निरागस हसू येण,
सौंदर्य म्हणजे ,
धूसर डोळ्यांना आत्मविश्वासाची नजर भेटणं ,
तर कधी थरथरणाऱ्या हातांना भक्कम आधार भेटणं.
सौंदर्य म्हणजे ,
न किंचाळतही गाता येणं ,खरेपणानं वागता येणं,
नक्कल न करता लिहिता येणं,
कुठल्याही दडपणाशिवाय व्यक्त होता येणं.
सौंदर्य म्हणजे ,
कुणाचातरि आपल्यासाठीचा त्याग समजून घेणं ,
तर कधी नकळत कृतज्ञता व्यक्त करणं,
सौंदर्य म्हणजे,
रडणाऱ्याच्या दुःखात रडण्याऐवजी ते दूर करण्यासाठी झटण,
तर कधी दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं,
सौंदर्य म्हणजे ,
दिखाऊपणापेक्षाही खरेपणावर विश्वास ठेवता येणं,
आणि जगण्याला नवीन दृष्टीनं बघता येणं,
सौंदर्य म्हणजे ,
कुठल्याच गैरसमजाशिवाय येणाऱ्या प्रत्येक सेकंदात
सकारात्मकतेने आयुष्याचे पैलू उलगडणं,
सौंदर्य म्हणजे ,
बाह्य जगात आकर्षित न होता ,
स्वतःला नव्याने ,आत्मपरिक्षणाने घडवता येणं,

खूप छान
ReplyDeleteअतिसुंदर😍
ReplyDeleteChaan
ReplyDeleteAk number bhava
ReplyDelete