नशीबवरचा विश्वास

काहीतरी घडलं ,घडून गेलं,
तरीही मनात आशा आहे ,
नशीब चांगलंच घडवेल !

आज काहीतरी अनपेक्षित घडलं ,
माझं नुकसान होतंय ,
माझी सहनशक्तीच संपलीय,
पण मला खात्री आहे माझ्या नशिबात चांगलंच आहे!


माझं आयुष्य बदलतयं ,
खूप नवीन माणसांत मी आलोय ,काहींचा मला त्रास होतोय,
काहींनी मला किती बदललंय ,
मला कळत नाही  माझं नशीब एवढं निष्ठूर का झालंय?


प्रत्येक पावलावर  काटेच आहेत ,मला पुढेच  जाता येत नाही,
संघर्ष आहे खूप ,पण हिम्मतच होत नाही ,
चांगल्या गोष्टींचा मेळ जुळतच नाही ,
नाझीबाचे हे खेळ काही कळतंच नाही!

इतरांच्या वाटेला आहे किती सुख ,
त्याच्या दुप्पट दुःख  का बरं माझ्याच वाट्याला?
सगळं कसं सोप्पं इतरांसाठी ,
मग मलाच एवढा अवघड प्रवास का ?

तुझ्यावरचा विश्वासच उडालाय माझा,
म्हणूनच तुझाही  माझ्यावर ,विश्वास नाही का रे नाशीबा?

पण मला मात्र चांगलंच माहीत आहे ,
नशीब -प्रारब्ध अस काहीच नसतं ,
हे आपल्याच भ्रमाच वर्तुळ असतं!

म्हणूनच माणसाचं आयुष्य फक्त त्याच्या प्रामाणिक आणि  सकारात्मक प्रयत्नांवरच अवलंबून असतं,
आणि हे  ज्याचं त्याने समजून तत्परतेने  घडवायचं असतं .......….. 

Comments

  1. खुपचं छान शब्द रचना कुणाल.कल्पकतेला अजून विस्त्रुत स्वरुप दे.
    मस्त 👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤