सौंदर्य नजरेतलं..........

सौंदर्य म्हणजे,
 इवल्याशा कळीच मोहक फुल होताना तो क्षण जगणं,
तर कधी कुणाच्या तरी चेहऱ्यावर निरागस हसू येण,
सौंदर्य म्हणजे ,
धूसर  डोळ्यांना  आत्मविश्वासाची नजर भेटणं ,
तर कधी  थरथरणाऱ्या हातांना भक्कम आधार भेटणं.

सौंदर्य म्हणजे ,
न किंचाळतही  गाता येणं ,खरेपणानं वागता येणं,
नक्कल न करता लिहिता येणं,
कुठल्याही दडपणाशिवाय व्यक्त होता येणं.

सौंदर्य म्हणजे ,
कुणाचातरि आपल्यासाठीचा त्याग समजून घेणं ,
तर कधी नकळत  कृतज्ञता व्यक्त करणं,

सौंदर्य म्हणजे,
रडणाऱ्याच्या दुःखात रडण्याऐवजी ते दूर करण्यासाठी  झटण,
तर कधी दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं,

सौंदर्य म्हणजे ,
दिखाऊपणापेक्षाही  खरेपणावर विश्वास ठेवता येणं,
आणि जगण्याला नवीन दृष्टीनं बघता येणं,

सौंदर्य म्हणजे ,
कुठल्याच गैरसमजाशिवाय येणाऱ्या प्रत्येक सेकंदात
सकारात्मकतेने आयुष्याचे पैलू उलगडणं,

सौंदर्य म्हणजे ,
बाह्य जगात आकर्षित न होता ,
स्वतःला नव्याने ,आत्मपरिक्षणाने घडवता येणं,




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤