माणुसकी मरताना. ...........
त्या केरळमधल्या हत्तिणीला, जिला माणसातला 'अमानवी माणूस' दिसला .. जिनं माणसामुळे स्वतःसकट आपल्या पोटातल्या निष्पाप बाळाला गमावलं कायमचं. . "ही घटना कळाली आणि मन सुन्न झालय गं, माणूस माणसाशी स्वार्थी होऊन ,कसंही वागतो ,आपली पातळी त्याने ओलांडली केव्हाच. . पण तुझा जीव गेला त्या माणसांमुळे ,एका निष्पाप, मुक प्राण्याशी असं का वागावं? आपलं आयुष्य स्वस्त नाही हे कळतं त्या माणसाला,मग प्राणी सजीव नाहियेत का? का कळतं नाही हे त्याला? ही घटना एखाद्या माणसासोबत घडली असती तर? पण अगं तू तर प्राणीच आहेस, तुला कुठे भावना?असा निर्दयपणे विचार कशावरून नसेल केला त्यांनी? वाईट तर हे ऐकून वाटलं की,भुकेल्या जीवाची भूकही शांतता नाही करता आली त्यांना! आणि किती विचित्र ती लोकं? ज्यांनी किती सहज स्फोटकं भरलेलं अननस तुला - खायला दिलं, किती विश्वासघाती स्वभाव म्हणावा हा? तु विश्वास ठेवून चुक केलीस ,असं तुला वाटत असेल ना,खर तर खूप काही विस्कटलय मनात, तो शरीरात झालेला स्फोट !तू हादरली असशील स्फोटापेक्षा ,विश्वासघाताने! एवढी सुशिक्षित असूनही ती माणसं, अडाणीच व...