वेळ......⏰⏰⏰😊

 

वेळ .......⏰⏰😊❤

वेळ येते.....वेळ जाते.......
वेळ सर्वांचीच असते..वेळ कधीकधी कोणाचीच नसते...
वेळ असते सोबत त्यांच्याच जे वक्तशीर असतात....
वेळ कधीच वाईट नसते ..नसते कधीच वाईटही....
तरीही माणसं वेडी .....दोष वेळेलाच देतात.....
वेळ मला कधीकधी जगाच्याच पुढे असल्यासारखी वाटते...
वेळ नसते कोणाच्या हातात....कधीच. ..
चांगल्या क्षणी वेळ कमी वाटते...
दुःखाच्या क्षणी वेळ संपता संपत नाही......!
वेळेला सतत धावती वाटते...मन शांत असताना....
वेळ थांबलेली वाटते...मनातला गोंधळ वाढताना...
वेळ मित्रासारखी असते...कशीही असली ना तरीही कायम सोबत राहते....
वेळ सेकंद...मिनिट. .तास..वर्षे सगळ्यापलीकडे असते......
महत्त्व वेळेचं..वेळ येऊन गेल्यावरच कळतं...
वेळ खरच माणसाला किती गोष्टी दाखवून. ..शिकवून जाते....
वेळ जगणं समृद्ध करते.....
वेळ गोड-कडू आठवणींना मागे सोडून जाते......
वेळ जन्म मरणाचंच नाही तर माणसांचही रंग रूप दाखवून जाते....
वेळ जागं करते.....
वेळ प्रयत्नशील बनवते....
वेळ  कोणासाठी रिकामी किवा व्यस्त असते ...
खरं तर वेळ न्यायानेच पुढे जात असते...
वेळ गेलेली परत येत नाही......
असते तेव्हा मात्र काहीच कळत नाही....
वेळ वेळच असते....
कितीतरी गोष्टी आजूबाजूला ..आपल्या नकळत घडवून जात असते....
वेळ जग..माणसं....परिस्थिती. .आयुष्य. ..संकटं..
यशं-अपयश ...नियती ..कर्तृत्व. ..स्वाभिमान. .सगळ्याची..
साक्षीदार असते..तरीही खूप प्रामाणिक आणि कुठल्याही गोष्टीत गुंतून राहणारी नसते....
वाहत्या पाण्यासारखी पुढे जात असते....अनोळखी. ..खास...
आणि माणूस थांबून राहतो...तो  आयुष्य जगणं विसरतो...चांगल्याची वाट बघत राहतो...वेड्यासारखी...सहज प्रयत्न करण्यापेक्षा. ....
हाच फरक आहे वेळेत आणि आपल्यात..
वाटतं एवढंच योग्य वेळेत योग्य वागता यायला हवं..
वेळेपासून जास्तीत जास्त शिकता यायला हवं.....
कारण वेळ अमूल्य..अनमोल. ...असामान्य आहे....
चला वेळ जगूया. ....खंबीरपणे. ...

' ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

Time .......

Time comes ..... time goes .......
Time belongs to everyone..sometimes time belongs to no one ...
There is time with those who are on time ....
Time is never good, it is never bad.
Still people are crazy ..... blame is given on time .....
Time sometimes makes me feel like I'm ahead of the world ...
No one has time .... never. ..
At the best of times, time seems short ...
Time does not end in the moment of sorrow ......!
Time seems to be running fast ... when the mind is calm ....
Time seems to have stopped ... as the confusion in the mind grows ...
Time is like a friend ... no matter what, it stays with you forever ....
Time seconds ... minutes. Hours and years are beyond all ......
The importance of time is known only when the time comes and goes ...
Time really shows a man how many things. ..Teaches ....
Time enriches living .....
Time leaves sweet and bitter memories behind ......
Time shows not only birth and death but also human beings ....
Time wakes up .....
Time makes effort ....
For whom time is empty or busy ...
In fact, time moves on with justice ...
Time is running out
But when it is, I don't understand anything ....
Time is just time ....
There are so many things going on around us..is happening without our knowledge ....
Time world..man .... situation. .Life. ..Crisis ..
Success-failure ... destiny..does. ..Self-esteem. .Everything ..
Witness..but very honest and not involved in anything ....
It flows like flowing water .... unknown. ..Special ...
And man stays ... he forgets to live life ... he waits for the good ... like crazy ... rather than trying hard. ....
This is the difference between time and you.
I think we should be able to behave properly at the right time.
We should be able to learn as much as possible from time to time .....
Because time is precious. ... is unusual ....
Let's live time. .... firmly. ...



                -@kunal vijay Thakare. 






 

Comments

Popular posts from this blog

नकारात्मकतेचं सीमोल्लंघन..

Little things 😍😍

जुनून ....❤❤❤