Posts

Showing posts from June, 2019

सौंदर्य नजरेतलं..........

Image
सौंदर्य म्हणजे,  इवल्याशा कळीच मोहक फुल होताना तो क्षण जगणं, तर कधी कुणाच्या तरी चेहऱ्यावर निरागस हसू येण, सौंदर्य म्हणजे , धूसर  डोळ्यांना  आत्मविश्वासाची नजर भेटणं , तर कधी  थरथरणाऱ्या हातांना भक्कम आधार भेटणं. सौंदर्य म्हणजे , न किंचाळतही  गाता येणं ,खरेपणानं वागता येणं, नक्कल न करता लिहिता येणं, कुठल्याही दडपणाशिवाय व्यक्त होता येणं. सौंदर्य म्हणजे , कुणाचातरि आपल्यासाठीचा त्याग समजून घेणं , तर कधी नकळत  कृतज्ञता व्यक्त करणं, सौंदर्य म्हणजे, रडणाऱ्याच्या दुःखात रडण्याऐवजी ते दूर करण्यासाठी  झटण, तर कधी दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघणं, सौंदर्य म्हणजे , दिखाऊपणापेक्षाही  खरेपणावर विश्वास ठेवता येणं, आणि जगण्याला नवीन दृष्टीनं बघता येणं, सौंदर्य म्हणजे , कुठल्याच गैरसमजाशिवाय येणाऱ्या प्रत्येक सेकंदात सकारात्मकतेने आयुष्याचे पैलू उलगडणं, सौंदर्य म्हणजे , बाह्य जगात आकर्षित न होता , स्वतःला नव्याने ,आत्मपरिक्षणाने घडवता येणं,

नशीबवरचा विश्वास

Image
काहीतरी घडलं ,घडून गेलं, तरीही मनात आशा आहे , नशीब चांगलंच घडवेल ! आज काहीतरी अनपेक्षित घडलं , माझं नुकसान होतंय , माझी सहनशक्तीच संपलीय, पण मला खात्री आहे माझ्या नशिबात चांगलंच आहे! माझं आयुष्य बदलतयं , खूप नवीन माणसांत मी आलोय ,काहींचा मला त्रास होतोय, काहींनी मला किती बदललंय , मला कळत नाही  माझं नशीब एवढं निष्ठूर का झालंय? प्रत्येक पावलावर  काटेच आहेत ,मला पुढेच  जाता येत नाही, संघर्ष आहे खूप ,पण हिम्मतच होत नाही , चांगल्या गोष्टींचा मेळ जुळतच नाही , नाझीबाचे हे खेळ काही कळतंच नाही! इतरांच्या वाटेला आहे किती सुख , त्याच्या दुप्पट दुःख  का बरं माझ्याच वाट्याला? सगळं कसं सोप्पं इतरांसाठी , मग मलाच एवढा अवघड प्रवास का ? तुझ्यावरचा विश्वासच उडालाय माझा, म्हणूनच तुझाही  माझ्यावर ,विश्वास नाही का रे नाशीबा? पण मला मात्र चांगलंच माहीत आहे , नशीब -प्रारब्ध अस काहीच नसतं , हे आपल्याच भ्रमाच वर्तुळ असतं! म्हणूनच माणसाचं आयुष्य फक्त त्याच्या प्रामाणिक आणि  सकारात्मक प्रयत्नांवरच अवलंबून असतं, आणि...